लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, 24 September 2020

लोणावळ्यात १९ नवे कोरोना बाधित रुग्ण

लोणावळा शहरात आज गुरुवारी विविध भागातून १९ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. यात प्रामुख्याने बॅटरी हिल परिसरातील रुग्णांचा समावेश आहे. 

मंगळवारी घेण्यात आलेल्या विभागवार महासर्वेक्षण टप्प्या क्रमांक २ मध्ये खंडाळ्यातील बॅटरी हिल परिसरात एकदम १३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं निदान झालं होतं. त्यापार्श्वभूमीवर नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी रवि पवार यांनी तात्काळ निर्णय घेत स्थानिक नगरसेवक पूजा गायकवाड आणि रचना सिनकर यांच्या सहकार्याने बॅटरी हिल परिसरात आज गुरुवारी आणखी एक तपासणी शिबिर राबविले. या शिबिरात त्या भागातील ६२ जणांची तपासणी करण्यात आली, ज्यात ५ जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय कोविड केअर सेन्टर, झालावाडी  याठिकाणी घेण्यात आलेल्या चाचण्यामध्ये ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यात सिद्धार्थ नगर विभागात ३, स्वराज्य नगर विभागात २, बाजारपेठ विभागात २ याशिवाय बारा बंगला, वलवण, भांगरवाडी आणि हनुमान टेकडी या चार विभागात प्रत्येकी १ जनाचा समावेश आहे. खाजगी लॅब मधून इतर ३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

आज आढळुन आलेल्या १३ रुग्णामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या १०४५ झाली असून आतापर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज झालेल्यांची एकूण संख्या ६२७ इतकी आहे. याशिवाय मृतांची संख्या ३७ इतकी असून सक्रिय रुग्णांची संख्या ३८० इतकी आहे.

व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा  ( ग्रुप नंबर 9 )
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages