लोणावळा शहरातील कोरोना बधित रुग्णसंख्येने ६०० चा आकडा पार केला आहे. विशेष म्हणजे यातील ३०० पेक्षा अधिक रुग्ण हे केवळ मागील १० दिवसात आढळून आले आहे. रुग्णसंख्या वाढीचा हा वेग सर्वच लोणावळेकरांच्या चिंतेत वाढ करणारा असून, प्रत्येकाने पुढील काळात सावधानता बाळगून स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेण्याची गरज निर्माण करणारा आहे.
आज शुक्रवारी सकाळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार लोणावळा शहरातील भांगरवाडी विभागात ३, गावठाण विभागात २ तर तुंगार्ली, नांगरगाव आणि बारा बांगला या तीन विभागात प्रत्येकी १ असे एकूण ८ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. यामुळे लोणावळा शहरात एकूण कोरोना बाधित रुग्णसंख्या ६०१ झाली आहे.
लोणावळा शहरात २७ मे रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. तर त्यानंतर पुढील तीन महिन्यात म्हणजे ३१ ऑगस्ट पर्यंत शहरातील एकूण रुग्णसंख्या २९२ इतकी झाली. मात्र १ सप्टेंबर पासून शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आणि तेंव्हापासून १० सप्टेंबर पर्यंत, म्हणजे मागील केवळ १० दिवसात शहरातील रुग्णसंख्या ६०० पार गेली. याचा अर्थ शहरात मागील १० दिवसात तब्बल ३०९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. रुग्णवाढीचा हाच दर जर यापुढेही कायम राहिला तर सप्टेंबर अखेरीस शहरातील रुग्णसंख्येने १२०० चा टप्पा पार केलेला बघावयास मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनाच्या या वाढत्या प्रदूर्भावापासून आपल्याला आपल्या कुटुंबाला आणि आपल्या शहराला वाचावयाचे असेल तर प्रत्येकाने स्वतःच स्वतःवर एकप्रकारे कर्फ्यु लादून घेण्याची गरज आहे. अति आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडणे, बाहेर पडताना मास्कचा वापर करणं, सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे, गरम पाणी पिणे, रोज गरम पाण्याची वाफ घेणे आदी गोष्टींचा आपल्या रोजच्या जीवनात समावेश करणं आवश्यक झालं आहे.
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा ( ग्रुप नंबर ८ )
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

This comment has been removed by the author.
ReplyDelete