लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Friday, 11 September 2020

कोरोनामुळे लोणावळा शहरात ५ जणांचा मृत्यू; शहरात आज २८ जणांना कोरोनाची लागण

आजचा दिवस लोणावळा शहरासाठी दुःखद बातमी देणारा ठरला असून मागील ४८ तासात शहरातील कोरोनाची लागण झालेल्या ५ जणांचा दुःखद मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या पाच जणांमध्ये भांगरवाडी येथील ३ तर खोंडगेवाडी येथील १ आणि जुना खंडाळा येथील १ अशा २ महिलांचा समावेश आहे. याशिवाय लोणावळा शहरात आज शुक्रवारी एकूण २८ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये तुंगार्ली विभागातील ७, भांगरवाडी विभागातील ७, खंडाळा विभागातील ५, पांगोळी विभागातील २, गावठाण विभागातील २, खोंडगेवाडी विभागातील २ याशिवाय जुना खंडाळा, नांगरगाव आणि बारा बंगला या तीन विभागातील प्रत्येकी १ अशा एकूण २८ जणांचा समावेश आहे.

आज अखेर लोणावळा शहरात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६२१ झाली आहे. याशिवाय आतापर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या २७७ झाली आहे. तर शहरातील कोरोना मुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंत २५ झाली असून सध्या सक्रिय कोरोना बधितांची संख्या ३१९ इतकी आहे.


व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा  ( ग्रुप नंबर ८ )
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages