लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Friday, 11 September 2020

लोणावळा शहरात मंगळवारी दोन हजार लोकांची घेणार कोविड चाचणी

लोणावळा शहरात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर शहरातील सर्वच संशयित नागरिकांच्या कोविड चाचणी करून, त्यात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना तात्काळ उपचार उपलब्ध करून लोणावळा शहरात भविष्यात फैलावत जाणाऱ्या कोरोनावर लगाम घालण्याचा प्रयत्न लोणावळा नगरपरिषदेच्या वतीनं करण्यात येणार आहे. त्याचाच पहिला भाग म्हणून येत्या मंगळवारी म्हणजे १५ सप्टेंबर रोजी लोणावळा शहरात एका महा सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात आले असून या सर्वेक्षणात सुमारे २००० हजार लोकांची कोविड तपासणी करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी जाहीर केले आहे. आणि त्यासाठी मंगळवारी लोणावळा शहरात संपूर्ण लॉकडाऊन घेण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. 

लोणावळा नगरपरिषद कार्यालयात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी आणि मुख्याधिकारी रवि पवार यांनी वरील माहिती दिली. या महासर्वेक्षण मोहिमेबाबत बोलताना मुख्याधिकारी रवि पवार यांनी सांगितले की, मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या मोहिमे अंतर्गत घेण्यात येणाऱ्या कोविड चाचण्यामध्ये २००० रॅपिड अँटीजन टेस्ट तर ५०० आर.टी. पी.सी.आर. चाचण्यांचा समावेश आहे. या चाचण्या घेण्यासाठी कोविड केअर सेन्टर झालावादी, वागड सनेटेरियम, खंडाळा माध्यमिक शाळा, भुशी रामनगर शाळा, शाळा क्रमांक एक आणि संत ज्ञानेश्वर विद्यालय भांगरवाडी अशा सहा ठिकाणी स्वॅब कलेक्शन सेन्टरची सोय केली आहे. शिवाय मंगळवार पर्यंत झालावाडी शिवाय वागड सनेटेरियम येथे ५० तर डी.सी. हायस्कूल खंडाळा येथे ११० बेडची सुविधा असलेलं आयसोलेशन केंद्र सुरू करित असल्याचेही मुख्याधिकारी यांनी पुढं सांगितले. 

येत्या मंगळवारी सकाळी ८ ते १२ या ४ तासाच्या वेळेत ५७६ सेक्टर ऑफिसरच्या मदतीने शहरातील सर्वच प्रभागामधील संशयित रुग्णांना वरील ६ पैकी जवळ असणाऱ्या स्वॅब कलेक्शन सेन्टर वर नेण्यात येईल. त्याठिकाणी त्यांची अँटीजन चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना तात्काळ जवळपासच्या आयसोलेशन केंद्रावर पाठवण्यात येणार आहे. अँटीजन मध्ये कोणी निगेटिव्ह आले मात्र त्यांना लक्षण दिसत असेल तर आशा व्यक्तींचे स्वॅब आर.टी. पी.सी.आर. चाचणी साठी त्याच दिवशी घेण्यात येणार आहे. दरम्यान अँटीजन मध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील लोकांचा देखील त्याच दिवशी स्वॅब घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे गरज पडल्यास अशी मोहीम त्यापुढील आठवड्यातील मंगळवारी देखील राबविण्यात येणार आहे असं मुख्याधिकारी रवि पवार यांनी सांगितले.

व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा  ( ग्रुप नंबर ८ )
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages