लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Wednesday, 28 October 2020

लोणावळा शहरात आज कोरोनाचे नविन रुग्ण नाहीत; सक्रिय रुग्णसंख्या १९०

लोणावळा शहरात आज कोरोनाचा एकही नविन रुग्ण मिळून आला नाही. यामुळे शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1426 इतकी झाली आहे. यापैकी 1184 रुग्ण कोरोनावर मात करून बरे झाले असून सक्रिय रुग्णसंख्या 190 इतकी आहे. याशिवाय कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत मृत झालेल्यांची एकूण संख्या 51 झाली आहे. आज झालावाडी कोविड सेंटरमध्ये 11 जणांची अँन्टीजन तपासणी करण्यात आली. त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
लोणावळा शहराची वाटचाल सध्या कोरोना मुक्तीकडे सुरू आहे ही शहरातील सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. भविष्यात शहरात कोरोनाचे रुग्ण सापडू नयेत याकरिता लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने झालावाडी कोविड सेंटर याठिकाणी मोफत कोरोना अँन्टीजन तपासणी दररोज केली जाते. शहरातील कोणत्याही नागरिकाला थंडी, ताप, खोकला, सर्दी, डोकेदुखी, तोंडाला चव न लागणे, वास न येणे असे आजार जाणवत असल्यास त्यांनी तात्काळ झालावाडी याठिकाणी कोरोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन लोणावळा नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच चेहर्‍यावर मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages