लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Monday, 2 November 2020

लोणावळा शहरात कोरोनाचे केवळ 22 सक्रिय रुग्ण; आज 1 नविन रुग्ण


लोणावळा शहराची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू आहे. लोणावळा नगरपरिषदेने आज जाहिर केलेल्या सुधारित आकडेवारीनुसार शहरात केवळ 22 सक्रिय रुग्ण आहे. आज बाजारभागात 1 कोरोना रुग्ण मिळून आला. लोणावळा शहरात सुधारित यादीनुसार आतापर्यत 1272 कोरोना रुग्ण असून त्यापैकी 52 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1198 रुग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. झालावाडी कोविड सेंटरमध्ये आज अखेर पाच रुग्ण असून उर्वरित रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत, त्यापैकी बहुतांश रुग्ण दोन तीन दिवसात कोरोनामुक्त होतील असे मुख्याधिकारी रवी पवार यांनी सांगितले.
        
मागील काही दिवसात लोणावळ्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होऊ लागली आहे. लोणावळा शहराची वाटचाल सध्या कोरोना मुक्तीकडे सुरू आहे ही शहरातील सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. भविष्यात शहरात कोरोनाचे रुग्ण सापडू नयेत याकरिता लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने झालावाडी कोविड सेंटर याठिकाणी मोफत कोरोना अँन्टीजन तपासणी दररोज केली जाते. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्या मोहिमेचा दुसरा टप्पा अंतिम पातळीवर आहे.तसेच मागील महिनाभरात शहरात केवळ दोन मृत्यू झाले आहेत, ही देखील समाधानाची बाब म्हणावी लागेल.
   
आयसीएमआर कडून उपलब्ध होत असलेल्या नोंदीनुसार तालुका आरोग्य विभागाच्या यादीत लोणावळा ग्रामीण परिसरात रहाणारे रुग्ण देखील लोणावळा नगरपरिषद हद्दीत दाखविण्यात आल्याने एकूण रुग्णांचा तसेच सक्रिय रुग्णांचा आकडा जास्त दाखविला जात होता. त्यामध्ये आता सुधारणा करण्यात आली आहे. 
   
शहरातील कोणत्याही नागरिकाला थंडी, ताप, खोकला, सर्दी, डोकेदुखी, तोंडाला चव न लागणे, वास न येणे असे आजार जाणवत असल्यास त्यांनी तात्काळ झालावाडी याठिकाणी कोरोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन लोणावळा मुख्याधिकारी रवी पवार यांनी केले आहे. तसेच चेहर्‍यावर मास्क लावल्याशिवाय कोणीही घराबाहेर पडू नका, कोरोना कमी झाला म्हणून गाफिल राहू नका असे पवार म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages