लोणावळा शहरात आज एकाच दिवशी १३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे शहरात ओसरत चाललेली कोरोनाची लाट पुन्हा एकदा उसळण्याची भीती निर्माण झाली आहे.
लोणावळा शहरात मागील दोन आठवड्यात कोरोना बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण खूपच कमी झाले होते. त्यामुळे लोणावळा शहरातून कोरोनाचे समूळ उच्चाटन होऊ लागले असल्याचे वातावरण नागरिकांमध्ये निर्माण झाले होते. आणि त्याचा परिणाम नागरिकांच्या जीवनमानावर झाल्याचेही दिसून येऊ लागले होते. कोरोना बाबत एक बेफिकिरी नागरिकांमध्ये निर्माण होत असतानाच आज आज अचानक १३ रुग्ण आढळून आल्याने पुन्हा तणावाचे वातावरण तयार होऊ आहे. त्यातच कोरोना रोगाच्या वाढीसाठी पोषक असलेले थंडी चे वातावरण लोणावळा शहरात निर्माण होऊ लागले आहे. त्यामुळे नागरिकांनी यापुढे अजून काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा परतू लागलेली कोरोनाची लाट पुन्हा फिरून येऊ शकते.
आज पॉझिटिव्ह आढळून आलेल्या १३ रुग्णांमध्ये नांगरगाव विभागातील ६, ई वॉर्ड विभागातील ३, भंगरवाडी विभागातील ३ तर तुंगार्ली विभागातील १ रुग्णाचा समावेश आहे.
शहरातील कोणत्याही नागरिकाला थंडी, ताप, खोकला, सर्दी, डोकेदुखी, तोंडाला चव न लागणे, वास न येणे असे आजार जाणवत असल्यास त्यांनी तात्काळ आपली कोरोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन लोणावळा मुख्याधिकारी रवी पवार यांनी केले आहे. तसेच चेहर्यावर मास्क लावल्याशिवाय कोणीही घराबाहेर पडू नका, कोरोना कमी झाला म्हणून गाफिल राहू नका असे देखील मुख्याधिकारी रवी पवार म्हणाले.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा ( ग्रुप नंबर 10 )
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
टेलिग्राम वर मला जॉईन करा
Vishal Padale blog
Vishal Padale blog

No comments:
Post a Comment