लोणावळा शहरात आज शुक्रवारी पुन्हा एकदा ५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बुधवारच्या दिवशी १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्या नंतर काल गुरुवारी केवळ एक जनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र त्यानंतर आहे पुन्हा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने चिंता निर्माण होऊ लागली आहे.
आज पॉझिटिव्ह आढळून आलेल्या ५ रुग्णांमध्ये बाजार विभागातील ४ तर तुंगार्ली विभागातील १ रुग्णाचा समावेश आहे. सोबतच आज एक रुग्ण कोरोनवर मात करून बरा झाल्याने त्यांना कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
लोणावळा नगरपरिषदेच्या वतीनं झालावाडी याठिकाणी सुरू असलेले कोविड केअर सेंटर वागड सॅनेटेरियम या ठिकाणी हलविण्यात आले आहे. त्यामुळे यापूर्वी शहरातील कोणत्याही नागरिकाला काही आजार जाणवत असल्यास त्यांनी तात्काळ वागड कोविड सेंटर याठिकाणी आपली कोरोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि मुख्याधिकारी रवी पवार यांनी केले आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा ( ग्रुप नंबर 10 )
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
टेलिग्राम वर मला जॉईन करा
Vishal Padale blog
Vishal Padale blog

No comments:
Post a Comment