लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Saturday, 3 October 2020

लोणावळा शहरात मागील दोन दिवसात ५५ कोरोना बाधित रुग्ण; शहरातील एकूण रुग्णसंख्या १२०० पार

लोणावळा शहरात शुक्रवार दिनांक २ ऑक्टोबर आणि शनिवार दिनांक ३ ऑक्टोबर या मागील दोन दिवसात ५५ नवे कोरोना बधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे लोणावळा शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज रविवारी सकाळ पर्यंत १२३७ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत ८०१ रुग्ण कोरोना वर मात करून बरे झाले असून आजमितीला शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ३९३ इतकी आहे. याशिवाय आतापर्यंत ४३ जनांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मागील दोन दिवसात पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये भांगरवाडी विभागातील १७, वलवण विभागातील १२, नांगरगाव विभागातील ९, खंडाळा विभागातील ६, वर्धमान सोसायटी विभागातील ५, तुंगार्ली विभागातील ३ तर रामनगर, जी वॉर्ड आणि लोणावळा बाजारपेठ या तीन विभागातील प्रत्येकी १ अशा एकूण ५५ जनांचा समावेश आहे.


व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा  ( ग्रुप नंबर 10 )
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages