लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Sunday, 4 October 2020

लोणावळा शहरात आज ८ कोरोना बाधित रुग्ण

लोणावळा शहरात आज रविवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी ८ नवे कोरोना बधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे लोणावळा शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज रविवार अखेरपर्यंत १२४५ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत ८०९ रुग्ण कोरोना वर मात करून बरे झाले आहे. आजमितीला शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ३९३ इतकी आहे. याशिवाय आतापर्यंत ४३ जनांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.

आज आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ही लोणावळेकरांच्या दृष्टीने निश्चितच दिलासादायक आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये पंगोळी विभागात ३, भांगरवाडी विभागातील २ तर लोणावळा बाजारपेठ, वलवण आणि खोंडगेवाडी या तीन विभागातील प्रत्येकी १ अशा एकूण ८ जनांचा समावेश आहे. 

शहरातील कुठल्या विभागातील, कोणत्या वयोगटातील किती पॉझिटिव्ह, किती जण सक्रिय, किती जणांना डिस्चार्ज ही सर्व माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपण खालील छायाचित्र बघू शकता. 

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा  ( ग्रुप नंबर 10 )
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages