लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Monday, 5 October 2020

लोणावळा शहरात आज ३५ कोरोना बाधित रुग्ण

लोणावळा शहरात आज रविवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी ३५ नवे कोरोना बधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे लोणावळा शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज सोमवार अखेरपर्यंत १२८० इतकी झाली आहे. तर आतापर्यंत ८५० रुग्ण कोरोना वर मात करून बरे झाले आहे. आजमितीला शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ३८७ इतकी आहे. याशिवाय आतापर्यंत ४३ जनांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.

लोणावळा नगरपरिषदेच्या वतीनं आज लोणावळा गावठाण विभागात एका विशेष कोरोना तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. याशिवाय झालावाडी आणि वागड या कोविड केअर सेन्टर वर तसेच खाजगी लॅबमध्ये घेण्यात आलेल्या तपासण्यामध्ये देखील अनेक जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. मिळालेल्या माहितीनुसार आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये लोणावळा गावठाण विभागातील ११, खंडाळा विभागातील ८, भांगरवाडी विभागातील ६, वलवण विभागातील २, पंगोळी विभागातील २, हनुमान टेकडी विभागातील २, हुडको विभागातील २ तर सिद्धार्थ नगर आणि तुंगार्ली या दोन विभागातील प्रत्येकी १ अशा एकूण ३५ जनांचा समावेश आहे. 

शहरातील कुठल्या विभागातील, कोणत्या वयोगटातील किती पॉझिटिव्ह, किती जण सक्रिय, किती जणांना डिस्चार्ज ही सर्व माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपण खालील छायाचित्र बघू शकता. 

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा  ( ग्रुप नंबर 10 )
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages