लोणावळा शहरात आज बुधवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी १० नवे कोरोना बधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे लोणावळा शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज अखेरपर्यंत १३११ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत ८९५ रुग्ण कोरोना वर मात करून बरे झाले आहे. आजमितीला शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ३७२ इतकी आहे. याशिवाय आतापर्यंत ४४ जनांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.
लोणावळा नगरपरिषदेच्या वतीनं आज लोणावळा खोंडगेवाडी आणि ठोंबरेवाडी विभागात एका विशेष कोरोना तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. याशिवाय झालावाडी कोविड केअर सेन्टर येथे घेण्यात आलेल्या तपासण्यामध्ये ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. मिळालेल्या माहितीनुसार आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये लोणावळा रायवूड विभागातील ५, हुडको विभागातील २, वलवण विभागातील २ तर भांगरवाडी विभागातील १ अशा एकूण १० जनांचा समावेश आहे.
शहरातील कुठल्या विभागातील, कोणत्या वयोगटातील किती पॉझिटिव्ह, किती जण सक्रिय, किती जणांना डिस्चार्ज ही सर्व माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपण खालील छायाचित्र बघू शकता.

No comments:
Post a Comment