लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Friday, 9 October 2020

लोणावळा शहरात आज २३ कोरोना बाधित रुग्ण

लोणावळा शहरात आज शुक्रवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी २३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यातील १६ जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले असून इतर ७ रुग्णांचे अहवाल हे मागील दोन दिवसामधील असून ते खाजगी लॅब मधून आज प्राप्त झाले आहे. त्यामुळे लोणावळा शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज अखेरपर्यंत १३४० इतकी झाली आहे. तर आतापर्यंत ९२५ रुग्ण कोरोना वर मात करून बरे झाले आहे. आजमितीला शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ३६९ इतकी आहे. याशिवाय मागील दोन दिवसात २ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याने आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे मृत झालेल्यांची एकूण संख्या ४६ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये खोंडगेवाडी विभागातील ४, भांगरवाडी विभागातील ४, नांगरगाव विभागातील ४, वलवण विभागातील ३, लोणावळा बाजार विभागातील २, ई वॉर्ड विभागातील २, डी वॉर्ड विभागातील २ तर जी वॉर्ड आणि गवळीवाडा या दोन विभागातील प्रत्येकी १ अशा एकूण २३ जनांचा समावेश आहे. 

शहरातील कुठल्या विभागातील, कोणत्या वयोगटातील किती पॉझिटिव्ह, किती जण सक्रिय, किती जणांना डिस्चार्ज ही सर्व माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपण खालील छायाचित्र बघू शकता. 

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा  ( ग्रुप नंबर 10 )
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages