लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Sunday, 15 November 2020

लोणावळा शहरात आज ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

लोणावळा शहरात आज रविवारी ५ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. यातील चार रुग्ण हे तुंगार्ली गावातील असून एक रुग्ण हा बाजारपेठ विभागातील आहे.

लोणावळा नगरपरिषदेच्या वागड कोविड केअर सेंटर याठिकाणी रविवारी १४ जणांच्या रॅपिड अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. या टेस्टमध्ये एकूण पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात बाजारपेठ विभागातील एक ३० वर्षीय युवकाचा तर तुंगार्ली विभागातील एकाच कुटुंबातील दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र नागरिक एकत्र येत असताना तसेच सार्वजनिक ठिकाणी देखील गर्दी उसळली असताना कोविड रुग्णांची आजची संख्या काळजी उत्पन्न करणारी आहे. त्यामुळे नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि मुख्याधिकारी रवी पवार यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages