लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, 1 December 2020

मशाल महोत्सवाने उजळला राजमाची किल्ल्याचा परिसर

लोणावळा : सुमारे दोन हजार वर्षांपेक्षा जास्त काळ इतिहासाचा साक्षीदार असलेला आणि शिवकाळात अत्यंत महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी एक असलेला राजमाची किल्ला परिसर नुकत्याच साजरा करण्यात आलेल्या मशाल मोहोत्सवामुळे उजळून निघाला. त्यातही मनरंजन बाले किल्ल्याच्या बुरुजावर टाकण्यात आलेल्या विविध रंगी प्रकाश झोतामुळे हा बुरुज सर्वांचे आकर्षक ठरला होता.

त्रिपुरारी पौर्णिमाच्या निमित्ताने राजमाची किल्ल्यावर आयोजित करण्यात येणाऱ्या मशाल महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. केवळ २५ घरांचा उंबरा असलेलं राजमाची हे आदिवासी गाव. परंतु जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे आणि राजमाची ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या मशाल महोत्सवाला सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचं पालन करीत ग्रामस्थांसोबतच पर्यटकांनी देखील उपस्थिती लावली होती. 


मशाल महोत्सवाच्या निमित्ताने स्थानिक आदिवासी महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम घेण्यात आला. सौ. विद्या नितीन मराठे यांच्या हस्ते यातील विजेत्या महिलांना पैठणी तसेच इतर बक्षिसांचे वाटप करण्यात आले. याशिवाय कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात शिवकालीन आणि पारंपरिक वेशभूषा करीत मर्यादित नागरिकांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी गावातून काढण्यात आली. या पालखीच्या पुढे मर्दानी खेळांचे प्रत्येक्षिक सादर करण्यात आली. तर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात शिवशाहीर वैभव घरत यांच्या पोवाड्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

राजमाची मशाल महोत्सवाच्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, नगरसेवक निलेश पांढरकर, विशाल पाडाळे, वराळे गावच्या सरपंच मनीषा शिंदे, राजमाचीच्या सरपंच प्रगती वरे, ऍड. विनय दाभाडे, भाजप महिला आघाडी तालुकाध्यक्ष सायली बोत्रे आणि इतर महिला पदाधिकारी, शिवसह्याद्री सदस्य, युवा आर्टिस्ट ग्रुप सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages