लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, 1 December 2020

पदवीधर मतदार संघासाठी लोणावळ्यात ६२.४३ टक्के मतदान; शिक्षक मतदार संघासाठी ६८.४३ टक्के मतदान

लोणावळा : पुणे पदवीधर मतदार संघ तसेच शिक्षक मतदार संघासाठी झालेल्या मतदानात लोणावळा शहरात मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवीत मतदान केले. त्यामुळे या दोन्ही निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ६० टक्क्यांच्या पुढं गेली.

पुणे पदवीधर मतदार संघासाठी लोणावळा शहरात एकूण १०२२ मतदारांपैकी ६३८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात ४३० पुरुष मतदार तर २०८ महिला मतदारांचा समावेश होता. मतदानाची एकूण टक्केवारी ६२.४३ टक्के इतकी राहिली. याशिवाय शिक्षक मतदार संघासाठी लोणावळा शहरात ६८.४३ टक्के मतदान झाले. एकूण ४३४ मतदारांपैकी २९७ मतदारांनी मतदान केले. यात १८८ पुरुष मतदार तर १०९ महिला मतदारांचा समावेश होता.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages