लोणावळा : लोणावळा शहरात आज सोमवारी ७ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहे, त्यामुळे शहरातील आता एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ३६ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये भांगरवाडी विभागात ३, हुडको विभागात २, तर वलवण आणि नांगरगाव विभागात प्रत्येकी १ अशा एकूण ७ जणांचा समावेश आहे. त्यामुळे आता शहरातील भांगरवाडी विभागात एकूण सक्रिय संख्या संख्या १७ इतकी झाली आहे. याशिवाय तुंगार्ली विभागात १२ रुग्ण सक्रिय असून हुडको जी वॉर्ड विभागात ४, आगवाली चाळ, नांगरगाव आणि वलवन या तीन विभागात प्रत्येकी १ असे एकूण ३६ जण सक्रिय कोरोना बाधित रुग्ण आहेत.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
टेलिग्राम वर मला जॉईन करा
Vishal Padale blog
Vishal Padale blog

No comments:
Post a Comment