लोणावळा शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज रविवारी लोणावळा शहरात कोरोनाचे तब्बल 37 नविन रुग्ण मिळून आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज रविवारी लोणावळा शहरात वलवण, खंडाळा आणि नांगरगाव विभागात 5, भुशी रामनगर विभागात 4, भांगरवाडी, न्यू तुंगार्ली आणि बारा बांगला विभागात प्रत्येकी 3, तुंगार्ली आणि गवळीवाडा विभागात प्रत्येकी 2 तर रोहिदास वाडा, बाजारपेठ, कैवल्यधाम, खोंडगेवाडी आणि जुना खंडाळा विभागात प्रत्येकी 1 कोरोना रुग्ण असे एकूण 37 रुग्ण मिळून आले आहेत.
लोणावळा व ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संचारबंदीचा आदेश लागू केला आहे. या आदेशाचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. कोरोनाची लक्षणे असल्यास आजार अंगावर न काढता तात्काळ कोरोना तपासणी करून घ्यावी. लोणावळा नगरपरिषदेच्या शाळा क्र. 1 याठिकाणी कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. त्याच ठिकाणी कोरोना तपासणी केली जात आहे. तसेच लोणावळा नगरपरिषदेच्या निलकमल थिएटर समोरील गुजराती शाळा येथे शंकेश्वर रुग्णालय, खंडाळा प्राथमिक उपकेंद्र, कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्र, कुरवंडे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व कुसगाव सिंहगड महाविद्यालय येथील ग्रामीण रुग्णालय याठिकाणी कोरोना लसीकरण मोहिम सुरू आहे. त्याठिकाणी जाऊन 45 ते 60 वयोगटातील नागरिकांनी मोफत लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment