लोणावळा : नागरिकांनो सावधान, लोणावळा शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढतच आहे. आज मंगळवारी (दि. 20 एप्रिल) लोणावळा शहरात कोरोनाचे पुन्हा 40 नविन रुग्ण मिळून आले आहे. तर शहराच्या विविध भागातील 4 जणांचा कोरोना मुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
आज लोणावळा शहरातील तुंगार्ली व वलवण विभागात प्रत्येकी 8 रुग्ण मिळून आले आहेत तर भुशी गाव परिसरात 5, नांगरगाव व भांगरवाडी परिसरात प्रत्येकी 4, खंडाळा परिसरात 3 तर पोर्टरचाळ, रामनगर, खोंडगेवाडी, हुडको, पांगोळी, रोहिदासवाडा, सुर्या रिसाॅर्ट व बाराबंगला येथे प्रत्येकी 1 रुग्ण असे 40 कोरोना रुग्ण मिळून आले आहेत.
लोणावळा शहर व ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संचारबंदीचा आदेश लागू केला आहे. या आदेशाचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. कोरोनाची लक्षणे असल्यास आजार अंगावर न काढता तात्काळ कोरोना तपासणी करून घ्यावी. लोणावळा नगरपरिषदेच्या शाळा क्र. 1 याठिकाणी कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. त्याच ठिकाणी कोरोना तपासणी केली जात आहे. तसेच लोणावळा नगरपरिषदेच्या निलकमल थिएटर समोरील गुजराती शाळा येथील शंकेश्वर रुग्णालय, खंडाळा प्राथमिक उपकेंद्र, कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्र, कुरवंडे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व कुसगाव सिंहगड महाविद्यालय येथील ग्रामीण रुग्णालय याठिकाणी कोरोना लसीकरण मोहिम सुरू आहे. त्याठिकाणी जाऊन 45 ते 60 वयोगटातील नागरिकांनी मोफत लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment