लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Saturday, 24 April 2021

लोणावळा शहरात आज शनिवारी कोरोनाचे ४० रुग्ण सापडले आहेत

लोणावळा :  लोणावळा शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. आज शनिवारी (दि. २४ एप्रिल) लोणावळा शहरात कोरोनाचे ४० नविन रुग्ण मिळून आले आहे. लोणावळा शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व शहर पुर्णपणे सॅनिटाईझ करण्यासाठी आज शनिवार पासून पुढील पाच दिवस लोणावळा शहरात कडक लाॅकडाऊन करण्यात आला आहे.
      
आज शहरात वलवण विभागात १३, भांगरवाडी विभागात ९, तुंगार्ली विभागात ४, न्यू तुंगार्ली विभागात ४, नांगरगाव विभागात ३, भुशी विभागात २, खंडाळा विभागात २ तर कैवल्यधाम, जी वॉर्ड आणि टाटा कॅम्प या तीन विभागात प्रत्येकी १ असे एकूण ४० रुग्ण आढळून आले आहे.
    
लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने काल भुशी गावात तर आज वलवण गावात नागरिकांच्या रॅपिड अँन्टीजन टेस्ट करण्यात आल्या.          
         
लोणावळा शहर व ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संचारबंदीचा आदेश लागू केला आहे. या आदेशाचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. कोरोनाची लक्षणे असल्यास आजार अंगावर न काढता तात्काळ कोरोना तपासणी करून घ्यावी. लोणावळा नगरपरिषदेच्या शाळा क्र. 1 याठिकाणी कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. त्याच ठिकाणी कोरोना तपासणी केली जात आहे. तसेच लोणावळा नगरपरिषदेच्या निलकमल थिएटर समोरील गुजराती शाळा येथील शंकेश्वर रुग्णालय, खंडाळा प्राथमिक उपकेंद्र, कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्र, कुरवंडे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व कुसगाव सिंहगड महाविद्यालय येथील ग्रामीण रुग्णालय याठिकाणी कोरोना लसीकरण मोहिम सुरू आहे. त्याठिकाणी जाऊन ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांनी मोफत लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. लोणावळा शहरात आज लाॅकडाऊन कडकडीत पाळण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages