लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Monday, 26 April 2021

लोणावळा शहरात आज सोमवारी कोरोनाचे 32 रुग्ण सापडले आहेत

लोणावळा : लोणावळा शहरात आज सोमवारी (दि. 26 एप्रिल) कोरोनाचे 32 नविन रुग्ण मिळून आले आहे. लोणावळा शहरातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 389 असल्याने ती चिंतेची बाब आहे.
   
लोणावळा शहरात आज खंडाळा विभागात सर्वांधिक 10 रुग्ण मिळून आले आहे तर नांगरगाव परिसरात 6, भांगरवाडी परिसरात 5, वलवण परिसरात 3, गावठाण व रायवुड परिसरात प्रत्येकी 2 तर बाजारपेठ, ठोंबरेवाडी, गवळीवाडा व भुशी गाव येथे प्रत्येकी 1 असे एकूण 32 कोरोना रुग्नब मिळून आले आहेत.
   
लोणावळा शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने तीन दिवसांचा लाॅकडाऊन जाहिर केला आहे. याला व्यापारी वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोणावळा शहरातील सर्व दुकाने आज बंद होती मात्र रस्त्यावर नागरिकांची वर्दळ पहायला मिळाली. लाॅकडाऊन हा नगरपरिषदेसाठी नसून नागरिकांच्या आरोग्यच्या हेतूने करण्यात आलेला आहे, याचे भान नागरिकांनी ठेवण गरजेचे आहे.       
   
महाराष्ट्र शासनाने संचारबंदीचा आदेश लागू केला आहे. या आदेशाचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. कोरोनाची लक्षणे असल्यास आजार अंगावर न काढता तात्काळ कोरोना तपासणी करून घ्यावी. लोणावळा नगरपरिषदेच्या शाळा क्र. 1 याठिकाणी कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. त्याच ठिकाणी कोरोना तपासणी केली जात आहे. तसेच लोणावळा नगरपरिषदेच्या निलकमल थिएटर समोरील गुजराती शाळा येथील शंकेश्वर रुग्णालय, खंडाळा प्राथमिक उपकेंद्र, कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्र, कुरवंडे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व कुसगाव सिंहगड महाविद्यालय येथील ग्रामीण रुग्णालय याठिकाणी कोरोना लसीकरण मोहिम सुरू आहे. नागरिकांनी मोफत लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages