लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, 27 April 2021

बिनकामी रस्त्यावर फिरणाऱ्यांवर नगरपरिषद आणि पोलिसांची कारवाई; १० जणांची रवानगी कोविड केअर सेंटरला

लोणावळा : खोटी कारण सांगत विनाकारण घराबाहेर पडून रस्त्यावर फिरणाऱ्या ५० जणांची लोणावळा नगरपरिषद आणि लोणावळा शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत रॅपिड अँटीजन चाचणी केली असता त्यातील १० जणांचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आला. या सर्वच्या सर्व १० जणांची रवानगी थेट कोविड केअर सेंटरला करण्यात आली आहे.

राज्य सरकारने संपूर्ण राज्यभरात संचारबंदी जाहीर केली असताना तसेच लोणावळा शहरात लॉकडाऊन असताना देखील अनेक जण विनाकारण रस्त्यावर फिरत असतात. अशा नागरिकांवर अंकुश ठेवण्यासाठी तसेच कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लोणावळा नगरपरिषद आणि लोणावळा शहर पोलिसांनी मंगळवार पासून जोरदार कारवाई सत्र सुरू केलं आहे. यासाठी शहरातील कुमार चौक तसेच भांगरवाडी इंद्रायणी पूल याठिकाणी चेकपोस्ट उभे करून त्याठिकाणी ये जा करणाऱ्या संशयित नागरिकांची रॅपिड अँटीजन चाचणी घेतली जात आहे. 
स्वतः नगराध्यक्षा सुरेखा जाधव, नगरसेवक विशाल पाडाळे, उपमुख्याधिकारी भगवान खाडे यांच्यासह पो.नि. दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पो.कॉ. विकास कदम, राजू कोळी आणि त्यांची पोलिस टीम तसेच डॉ. सीमा शिंदे आणि त्यांची वैद्यकीय टीम या कारवाई मध्ये सहभागी झाले होते. मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, नगरसेविक निखिल कवीश्वर आणि नगरसेविका आरोही तळेगावकर यांनी देखील या कारवाईमध्ये आपला सहभाग नोंदवला. 

कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी काही ठोस आणि कडक पावलं उचलणं गरजेचे असल्याने मंगळवारी सुरू करण्यात आलेली ही कारवाई जोवर संचारबंदी कायम आहे तोवर चालू राहणार असल्याचे नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी सांगितले. याशिवाय गुरुवारी शहरातील दुकान तसेच भाजी मंडई उघडल्यावर सर्व विक्रेत्यांनी आपल्या सोबत स्वतःची कोविड चाचणी केल्याचं प्रमाणपत्र जवळ बाळगणं आवश्यक असून, तसे न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल अशा सूचनाही नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी दिल्या आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages