लोणावळा : कोरोनाची साखळी रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कडक निर्बंध घातलेले असतानाही या नियमांचे उल्लंघन करत लग्न समारंभात २५ पेक्षा जास्त माणस जमवण मुंबईतील एक कुटुंबाला चांगलेच महागात पडलं . लोणावळ्यात घडलेल्या या घटनेत लोणावळा नगरपरिषदेने सदर कुटुंबाला ५० हजराचा तर लोणावळा पोलिसांनी विविध कलमान्वये कारवाई करत ७ हजार रुपये दंड ठोठावला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 पर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत . यामध्ये लग्न सोहळे 2 तासात उरकण्याचे आणि केवळ 25 नागरिकांच्या उपस्थितीमध्ये करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन न झाल्यास संबंधितांना 50 हजार रुपये दंड ठोठावण्याचे आणि ज्या ठिकाणी हा लग्न सोहळा पार पडत आहे ते ठिकाण कोविड 19 संसर्गाची अधिसूचना अस्तित्वात आहे तोपर्यंत बंद ठेवण्याचे म्हटले आहे .
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी ( 26 एप्रिल ) लोणावळा शहरातील गोल्ड व्हॅली, तुंगार्ली येथे एका बंगल्यात नियमांचे उल्लंघन करत लग्नसोहळा होत असल्याची माहिती नगरपरिषदेला प्राप्त झाली. त्यानुसार लोणावळा नगरपरिषदेच्या पथकाने व लोणावळा शहर पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन ही कारवाई केली . याशिवाय लोणावळा शहरात ५ दिवसांचे लॉक डाऊन जाहीर केले असतानाही रस्त्यावर भाजीचे दुकान थाटणाऱ्या एका विक्रेत्याला नगरपरिषदेच्या वतीनं २ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment