लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, 27 April 2021

लोणावळा


लोणावळा : नागरिकांनो काळजी घ्या, लोणावळा शहरात कोरोनाचे आज तब्बल 49 रुग्ण मिळाले आहेत. लोणावळा शहरात आज लाॅकडाऊन असताना विनाकरण फिरणार्‍या सुमारे 50 हून अधिक नागरिकांची कुमार चौक व इंद्रायणी पुलाजवळ कोरोना अँन्टीजन तपासणी करण्यात आली. यामध्ये 14 जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. यापैकी 13 जण लोणावळा व खंडाळा भागातील असून 1 जण आंबवणे येथील आहेत.
   
आज लोणावळा शहरातील वलवण गावात सर्वांधिक 17 रुग्ण मिळून आले आहेत. तर नांगरगाव परिसरात 9, खंडाळा परिसरात 9, गवळीवाडा, महाडा काॅलनी, ठोंबरेवाडी व पांगोळी परिसरात 2, रेल्वे काॅलनी, पीटीएस, रोहिदासवाडा, कालेकर मळा येथे प्रत्येकी 1 तर लोणावळा (पुर्ण पत्ता नाही) येथे 2 असे एकूण 49 रुग्ण मिळून आले आहेत. 
   
लोणावळा शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेने पाच दिवसांचा लाॅकडाऊन जाहिर करण्यात आलेला असताना देखील नागरिक बेफिकिरपणे रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. नागरिकांचे हे वागणं कोरोना वाढीला पोषक असल्याने सर्वांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages