लोणावळा : लोणावळा शहरात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण आढळुन येण्याच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून मागील नतीन दिवसांत तब्बल १०७ रुग्ण आढळून आल्यानंतर आज शनिवारी पुन्हा एकदा शहरात २५ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे बुधवार ते शनिवार या चार दिवसात लोणावळा शहरात कोरोना बाधित झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३२ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये भांगरवाडी विभागात ५, खंडाळा विभागात १०, तुंगार्ली विभागात २, सी वॉर्ड विभागात २, तर गावठाण, नांगरगाव, वलवण, बाजारपेठ, खोंडगेवाडी, आणि स्वराज्य नगर या सहा विभागात प्रत्येकी १ अशा एकूण २५ जणांचा समावेश आहे.
शहरात रोज वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना तसेच सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरावा, सामाजिक अंतर पाळावे असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव या वारंवार करीत आहे. याशिवाय कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी दिनांक ०१ एप्रिल पासून शाळा क्रमांक १ या ठिकाणी ७० बेडची सुविधा असलेलं कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रा सोबतच आता पार्श्वनाथ जैन रुग्णालयात देखील कोविड लसीकरण सुरू करण्यात आले असून ४५ वर्षाच्या वरील नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्षा जाधव यांनी केले आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा

No comments:
Post a Comment