लोणावळा : लोणावळा शहरात आज सोमवारी २७ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे लोणावळा शहरातील सक्रिय कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये भांगरवाडी विभागात ४, खंडाळा विभागात ५, नांगरगाव विभागात ५, तुंगार्ली विभागात ३, न्यू तुंगार्ली विभागात २, बाजारपेठ विभागात ४ तर सी वॉर्ड हनुमान टेकडी, गवळीवाडा आणि ठोंबरेवाडी या चार विभागात प्रत्येकी १ अशा एकूण २७ जणांचा समावेश आहे.
शहरात रोज वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना तसेच सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरावा, सामाजिक अंतर पाळावे असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव या वारंवार करीत आहे. याशिवाय कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी दिनांक ०१ एप्रिल पासून शाळा क्रमांक १ या ठिकाणी ७० बेडची सुविधा असलेलं कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रा सोबतच आता पार्श्वनाथ जैन रुग्णालयात देखील कोविड लसीकरण सुरू करण्यात आले असून ४५ वर्षाच्या वरील नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्षा जाधव यांनी केले आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा

No comments:
Post a Comment