लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Wednesday, 7 April 2021

लोणावळा शहरात आज बुधवारी कोरोनाचे २६ रुग्ण


लोणावळा : लोणावळा शहरात आज बुधवारी कोरोनाचे एकूण २६ रुग्ण मिळून आले आहेत . आज शहरातील हुडको कॉलनी विभागात २ , भांगरवाडी विभागात ४ , कैवल्याधाम विभागात १ , रेल्वे कॉर्टर विभागात १ , खंडाळा विभागात ५ , लोणावळा बाजारपेठ विभागात ६ , नांगरगाव विभागात २ , वर्धमान सोसायटी विभागात ३ , गवळीवाडा विभागात १ , खोंडगेवाडी विभागात १ असे २६ रुग्ण मिळून आले आहेत . 

लोणावळा शहरातील कोरोना रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये , महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना तसेच सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरावा , सामाजिक अंतर पाळावे असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव या वारंवार करीत आहे . मात्र बाजारापेठेतील गर्दी कमी होताना दिसत नाही . राज्यात सोमवार ते शुक्रवार कडक निर्बंध लागू करण्यात आले असून शुक्रवारची रात्र ते सोमवारी सकाळपर्यंत कडक लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे . तसेच दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी लागू असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये , भाजीपाला व जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू राहणार असल्याने कोणीही खरेदीसाठी विनाकारण गर्दी करू नये तसेच चेहऱ्यावर मास्क लावल्याशिवाय कोणीही संचार करू नये , शासकीय नियमांचे पालन करावे . 

लोणावळा शहरात शंखेश्वर रुग्णालय व खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रा सोबतच कुरवंडे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र , कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्र , सिंहगड महाविद्यालय कुसगाव येथे मोफत लसीकरण सुरू आहे . नागरिकांनी मनात कोणताही संभ्रम न ठेवता कोरोना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केले आहे . दुकाने बंद करण्याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जात असल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याने लोणावळा नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी व्यापारी वर्गाची बैठक घेत काय बंद ठेवायचं व काय चालू याबाबत मार्गदर्शन केल्यास व्यापारी वर्ग प्रशासनाला सहकार्य करायला तयार आहे .

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages