लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, 4 May 2021

लोणावळा शहरामध्ये सहा दिवसांचा लॉकडाऊन


लोणावळा : लोणावळा शहरात शुक्रवार दिनांक ७ मे ते बुधवार दिनांक १२ मे पर्यंत ६ दिवस संपूर्णपणे लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी मावळ मुळशी राजेंद्र जाधव ( अतिरिक्त कार्यभार ) यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत लोणावळा शहरासह तळेगाव , वडगाव व कामशेत ह्या मोठ्या शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

मावळ तालुक्यातील वाढती कोविड रुग्णसंख्या लक्षात घेता उपाययोजना करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या या बैठकीला प्रभारी तहसिलदार रावसाहेब चाटे , गटविकास अधिकारी सुधीर भागवत , मावळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ . चंद्रकांत लोहारे , मावळ तालुका कोवीड समन्वयक डॉ . गुणेश बागडे तसेच तळेगाव , लोणावळा नगरपालिका चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी , ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक , प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी , तळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक , वडगाव पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक उपस्थित होते . 

मावळ तालुक्यातील ज्या नगरपालिका क्षेत्रात व ग्रामीण भागातील ज्या गावांमध्ये कोविड १९ चा वेगाने प्रसार होत आहे तसेच सद्यस्थितीत त्याठिकाणी अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे तेथील प्रसार रोखण्याच्या उद्देशाने वरील निर्णय घेण्यात आला आहे. सदर लॉकडाऊन च्या काळात फक्त रुग्णालय सुविधा , औषधांची दुकाने चालू असतील तसेच सकाळी ७ ते ९ या दोन तासाच्या कालावधीत दूधवितरण सेवा चालू राहतील .

सदर लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी सदर कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय यंत्रणांना व पोलीस स्टेशन प्रमुख यांना याबाबतचे निर्देश दिलेले आहेत . सर्व लोकप्रतिनिधी , प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी , समाजसेवी संघटना व नागरिकांनी देखील या काळात नियमांचे पालन करावे व यंत्रणेला सहकार्य करावे जेणेकरून सर्वांच्या सहकार्याने कोविड चा वाढता प्रादुर्भाव आपल्याला रोखणे शक्य होईल असे आवाहन देखील माननीय उपविभागीय अधिकारी केले आहे .

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages