लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Saturday, 20 November 2021

लोणावळा नगरपरिषदेचा दिल्लीत डंका; राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कृत

लोणावळा : नुकत्याच पार पडलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 स्पर्धेत मध्ये संपूर्ण भारत देशात लोणावळा शहरास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. यासोबतच या स्पर्धेत सलग चौथ्या वर्षी राष्ट्रीय पातळीवर आपले नामांकन टिकवून ठेवत लोणावळा नगरपरिषदेने दिल्लीत आपल्या नावाचा डंका वाजवला आहे.

शनिवारी दिल्लीत विज्ञान भवन येथे पार पडलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 स्पर्धेच्या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या शुभहस्ते आणि केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या उपस्थितीत लोणावळा नगरपरिषदेला पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोणावळ्याच्या नगराध्यक्षा श्रीमती सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक श्रीधर पुजारी, तत्कालीन मुख्याधिकारी रवी पवार, विद्यमान मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्काराचा स्वीकार केला. याशिवाय लोणावळा शहरास कचरा मुक्त शहर या श्रेणीमध्ये 3 स्टार रेटिंग देखील प्राप्त झाल्याने नगर विकास विभाग सचिव दुर्गा शंकर प्रसाद यांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

यावेळी उपनगराध्यक्षा सुवर्णा अकोलकर, स्वच्छता आणि आरोग्य सभापती रचना सिनकर, नगरसेवक राजू बच्चे, देविदास कडू, नितीन आगरवाल, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड आदी मान्यवर सभागृहात उपस्थित होते. स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये 1 लाखां पेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांच्या श्रेणीत पाहिले तीन ही क्रमांक महाराष्ट्रातील शहरांनी पटकावली. यात प्रथम क्रमांक सांगली जिल्ह्यातील विटा नगरपरिषदेने तर द्वितीय आणि तृतीय हे दोन्ही क्रमांक पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे लोणावळा आणि सासवड या नगरपरिषदांनी पटकावला. या सर्वात विशेष बाब म्हणजे विटा आणि सासवड या नगरपरिषदांची लोकसंख्या ही 50 हजारच्या आतमध्ये असून लोणावळा नगरपरिषदेची लोकसंख्या 50 हजाराहून अधिक असून यात वर्षभरात या ठिकाणी येणाऱ्या लाखो पर्यटकांचा ही समावेश असतो. अशा परिस्थितीत लोणावळा नगरपरिषदेने सलग चौथ्या वर्षी हा पुरस्कार प्राप्त केला आहे. याचा आनंद लोणावळेकर नागरिक सोशल मीडियावर मोठ्या उत्साहात व्यक्त करीत आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages