लोणावळेकरांनी वाहिली लतादिदींना श्रद्धांजली
लोणावळा : गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांना लोणावळा शहरात सोमवारी सर्वपक्षीय सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लता दिदींच्या जाण्याने संगीत क्षेत्रातील एका युगाचा अंत झाल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेत नगराध्यक्षा सुरेखा जाधव, शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र खराडे, काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल कवीश्वर, सेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, नगरसेवक देविदास कडू, सुधीर शिर्के, नगरसेविका ब्रिंदा गणात्रा, संध्या खंडेलवाल, भाजपच्या महिला शहराध्यक्षा योगिता कोकरे, दिलीप गुप्ता, शाम सुतार आदींसह सर्वपक्षीय मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. लता मंगेशकर यांच्या जाण्याने प्रत्येक भारतीला मनस्वी दुःख झाले असून लता दीदी या आपल्या गीतांमधून आपल्यात कायम राहतील अशा शब्दात यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

No comments:
Post a Comment