तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोईत्रा यांनी जैन समाजावर केलेल्या वक्तव्याचा लोणावळ्यात निषेध
लोणावळा : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी लोकसभेत जैन समाजाबाबत केलेले आक्षेपार्ह वक्तव्य संसदेच्या आचारसंहितेला छेद देणारे असून त्यांनी संपूर्ण जैन समाजाची माफी मागावी अशी मागणी करीत भाजपा जैन प्रकोष्ठच्या वतीनं खासदार महुआ मोइत्रा यांचा निषेध नोंदविण्यात आला.
खासदार महुआ मोइत्रा यांनी बेजबाबदार विधान सभागृहात करण्याआधी भारतीय संस्कृतीचा विशेषतः जैन समाजातील खाद्य विधींचा थोडा अभ्यास करायला हवा होता. जैन समाज हा शाकाहारी समाज म्हणून जगभर ओळखला जातो हे सर्वश्रुत आहे. मात्र महुआ मोईत्रा यांची विधान जैन समाजाच्या भावना, विचार आणि मूल्ये नष्ट करणारे आहे. खासदार मोईत्रा यांनी लोकसभेत केलेल्या कथित वक्तव्यामुळे अल्पसंख्याक जैन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहे व जैन समाजात प्रचंड रोषाचे वातावरण पसरले असून त्यांना संपूर्ण जैन समाजाची माफी मागावी अन्यथा भाजपा जैन प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदन भाजपा जैन प्रकोष्ठच्या वतीनं लोणावळा शहर पोलीस ठाण्यात देण्यात आले.
याशिवाय सकल जैन संघ, जैन श्वेतांवर मुर्तीपूजक संघ, वर्धमान स्थानकवासी संघ यांच्या वतीने खासदार मोईत्रा यांचा जाहिर निषेध करण्यात आला. यावेळी कॅन्सर मुक्त अभियानाचे गिरीष पारख, सकल जैन संघाचे अशोक पारख, महेंद्र कांकरिया, संतोष चोरडिया, किशोर पारख, जयेश संचेती, मयूर ओस्तवाल, जयंती शेठ ओसवाल, कांतीलाल भुरट, सुमतीलाल चोरडिया, जितेंद्र छल्लाणी, संगीता सुरट, जयश्री सुराणा, किरण ओसवाल, निर्मल जैन, आयुष कांकरिया, अजित भुरट, संजय लुंकड आदींसह जैन बांधव उपस्थित होते.

No comments:
Post a Comment