लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Sunday, 21 June 2020

हुल्लडबाजी करणाऱ्या २२ बायकर्स वर लोणावळा पोलिसांची कारवाई

लोणावळा शहरातील भुशी धरण आणि परिसरात पर्यटनाला बंदी असतानाही पुणे मुंबई याठिकाणावरून आलेल्या बायकर्सने भुशी धरण आणि सहारा पूल याठिकाणी हुल्लडबाजी केल्याने लोणावळा शहर पोलिसांनी कडक कारवाई करीत गुन्हे दाखल केले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच लोणावळा शहरात जास्त पाऊस होत असल्याने याठिकाणी भुशी धरण तसेच परिसरात सातत्याने पाण्यात बुडून पर्यटकांच्या मृत्यूच्या घटना घडत असल्याने पुणे जिल्हाधिकारी यांनी एक आदेश पारित करीत भुशी धरण आणि परिसरात पर्यटनाला बंदी घातली आहे. हे माहिती असतानाही तसेच जिल्हाबंदी असतानाही त्याकडे दुर्लक्ष करीत भुशी धरण आणि परिसरात बाईकवर येऊन हुल्लडबाजी करताना आढळलेल्या २२ जणांवर लोणावळा शहर पोलिसांनी पो.नि. मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करीत संबंधितांवर भादवी कलम १८८, २६९, २७० व कोविड १९ उपाययोजना अधिनियम २०२० चे कलम ११ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages