लोणावळ्यातील आयएनएस शिवाजी या नौदल प्रशिक्षण केंद्रात रविवारी आणखी एक प्रशिक्षणार्थी जवान कोरोनाबाधित आढळला आहे. शनिवार दिनांक २० जून रोजी तीन प्रशिक्षणार्थी जवानांचे करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. रविवारी आणखी एका जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
मूळ उत्तर प्रदेश येथील असलेला हा कोरोनाबाधित जवान प्रशिक्षणासाठी ३ जून रोजी आयएनएस शिवाजी कॅम्पसमध्ये दाखल झाला होता. दरम्यान त्याला कॅम्पस मधेच क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र सदर जवानास गुरूवारी कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यास पुण्यातील लष्करी रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले होते. रविवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे आयएनएस शिवाजी नौदल प्रशिक्षण केंद्रात कोरोनाबाधित प्रशिक्षणार्थींची संख्या चार झाली आहे.

No comments:
Post a Comment