लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Sunday, 19 July 2020

लॉकडाऊन काळात झालेल्या घरफोडयांचा छडा लावण्यात लोणावळा पोलिसांना यश

लॉकडाऊन काळात झालेल्या लोणावळा शहरातील तुंगार्ली व पांगोळी परिसरातील दोन बंगल्यात झालेल्या घरफोडयांचा छडा लावण्यात लोणावळा पोलिसांना यश मिळाले आहे. या गुन्ह्यात तीन जणांना ताब्यात घेतले गेले असून हे तिघेही अल्पवयीन मुलं आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार वरील तिघांनीही लॉकडाऊन काळात तुंगार्ली व पांगोळी परिसरातील दोन बंद बंगल्यात घरफोडी करीत सामान लंपास केलं होतं. लोणावळा शहर पोलिसमध्ये गुन्हे शोध व प्रकटीकरण पथकामध्ये नेमणुकीला असणारे पो.ना. वैभव सुरवसे यांना गुप्त बतमीदाराच्या मार्फतीने संबंधित आरोपींची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पो.नि. मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. वैभव सुरवसे, पो.कॉ. अजीज मेस्त्री, मनोज मोरे, राजेंद्र मदने, पवण कराड यांनी आरोपींचा शोध घेत त्यांच्याकडून ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. यात ३२ इंची एलईडी टीव्ही, एक इन्व्हर्टर, दोन इन्व्हर्टर बॅटरी, गॅस शेगडी आणि लाईटचे झुमर याचा समावेश आहे. संबंधित आरोपीवर भादवी कलम ३८०, ४५४, ४५७ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages