लोणावळा नगरपरिषदेच्या वतीनं शहरातील १०० भाजी आणि फळ विक्रेत्यांची अँटी बॉडी टेस्ट आज शनिवारी करण्यात आली. यातील केवळ तीन जणांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या असून त्यांना कोविड-१९ च्या टेस्ट अर्थात करोना चाचणी साठी पाठवण्यात आले आहे.
करोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लोणावळा शहरात त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होऊ नये साठी खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व भाजी आणि फळ विक्रेते तसेच पेपर, दूध यांचे वाटप करणारे याशिवाय नगरपरिषदेचे सफाई कामगार यांच्या अँटी बॉडी टेस्ट अर्थात रॅपिड टेस्ट घेण्याचे मुख्याधिकारी रवि पवार यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार आज शनिवारी पहिल्या टप्प्यात १०० भाजी आणि फळ विक्रेत्यांच्या चाचण्या आज नगरपरिषद कार्यालयात घेण्यात आल्या. यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी रवि पवार आदी उपस्थित होते. सोमवार आणि मंगळवार अशा दोन दिवसात उर्वरित चाचण्या पूर्ण केल्या जाणार आहे.

No comments:
Post a Comment