लोणावळा शहरात आज शुक्रवारी दुसरा करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. सदर रुग्ण हा जुना खंडाळा विभागातील खंडोबा मंदिर परिसरातील असून आता लोणावळा शहरातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ६४ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सदर रुग्ण ५३ वर्षीय असून त्याला स्वतःला लक्षणं जाणवल्याने त्याने एका खाजगी लॅब मधून स्वतःची करोना चाचणी करून घेतली होती. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सद्यस्थितीत लोणावळा शहरातील आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३० तर एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३० इतकी झाली आहे. याशिवाय चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
लोणावळा शहरातील आजअखेर आढळून आलेल्या एकूण करोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे
गवळीवाडा - ६【बरे झालेले रुग्ण - १ / मृत्यू - २】
कोणार्क पॅरेडाईज, पांगोळी - ४【बरे झालेले रुग्ण - २ / मृत्यू - ०】
भांगरवाडी - १६【बरे झालेले रुग्ण - ८ / मृत्यू - ०】
नांगरगाव - ६【बरे झालेले रुग्ण - ६ / मृत्यू - ०】
खंडाळा (खंडाळा + जुना खंडाळा) - ११【बरे झालेले रुग्ण - ९ / मृत्यू - ०】
वलवण - २ 【बरे झालेले रुग्ण - १ / मृत्यू -१】
टेबल लँड, लोणावळा गावठाण, बाजारपेठ - ११【बरे झालेले रुग्ण - ३ / मृत्यू - ०】
रेल्वे विभाग - ६【बरे झालेले रुग्ण - ० / मृत्यू -१】
तुंगार्ली - २【बरे झालेले रुग्ण - ० / मृत्यू - ०】
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा

No comments:
Post a Comment