लोणावळा येथील भांगरवाडी विभागातील एका महिलेचा करोना चाचणी अहवाल आज शुक्रवारी पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे लोणावळा शहरात आता एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ६३ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सदर महिलेला लक्षण जाणवल्याने त्यांनी कोविड केअर सेन्टर, लोणावळा याठिकाणी स्वॅब तपासणी साठी दिले होते. त्याचा अहवाल आज पॉजिटीव्ह आला आहे. सदर बाधित महिला ही लोणावळा नगरपरिषदेमध्ये कर्मचारी आहे. कोविड केअर सेन्टर, लोणावळा याठिकाणी काल गुरुवारी ५ जणांचे स्वॅब करोना चाचणी साठी घेण्यात आले होते. त्यात भांगरवाडी येथील सदर महिलेचा तसेच मळवली येथील एका ६५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अन्य ३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आला आहे.
करोना केअर सेन्टर, लोणावळा येथून काल गुरुवारी ६ रुग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. यातील लोणावळा शहरातील ५ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे लोणावळा शहरातील आता बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३० तर एकूण सक्रिय रुग्णांची संख्या २९ इतकी झाली आहे.
लोणावळा शहरातील आजअखेर आढळून आलेल्या एकूण करोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे
गवळीवाडा - ६【बरे झालेले रुग्ण - १ / मृत्यू - २】
कोणार्क पॅरेडाईज, पांगोळी - ४【बरे झालेले रुग्ण - २ / मृत्यू - ०】
भांगरवाडी - १६【बरे झालेले रुग्ण - ८ / मृत्यू - ०】
नांगरगाव - ६【बरे झालेले रुग्ण - ६ / मृत्यू - ०】
खंडाळा (खंडाळा + जुना खंडाळा) - १०【बरे झालेले रुग्ण - ९ / मृत्यू - ०】
वलवण - २ 【बरे झालेले रुग्ण - १ / मृत्यू -१】
टेबल लँड, लोणावळा गावठाण, बाजारपेठ - ११【बरे झालेले रुग्ण - ३ / मृत्यू - ०】
रेल्वे विभाग - ६【बरे झालेले रुग्ण - ० / मृत्यू -१】
तुंगार्ली - २【बरे झालेले रुग्ण - ० / मृत्यू - ०】
लोणावळा नगरपरिषद official या नगरपरिषदेच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेल ला subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा

No comments:
Post a Comment