करोनाची लागण झाल्याने स्वतःच्या घरापासून, कुटुंबातील माणसांपासून दूर राहून उपचार घेत असलेल्या करोना बाधित रुग्णाचा जन्मदिन कोविड केअर सेन्टर, लोणावळा याठिकाणी साजरा करण्यात आला. कुटुंबापासून दूर असला तरी या काळात तुमची काळजी घ्यायला आणि तुमच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा संदेश या माध्यमातून कोविड रुग्णांना देण्याचा प्रयत्न कोविड केअर सेन्टर, लोणावळा येथील डॉक्टर, पोलीस आणि कर्मचारी यांनी केला आहे.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव पसरत असताना, अनेक रुग्णालयात, कोविड केअर सेन्टर मध्ये धांदल उडत असल्याचे वातावरण समोर येत आहे. कोविड केअर सेन्टरमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांकडून या सेन्टरमधून आपल्याला कसल्याही सुविधा मिळत नसल्याचे आरोप मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर लोणावळा येथील कोविड केअर सेन्टरमध्ये निर्माण करण्यात आलेले हे वातावरण अत्यंत सुखावह आणि करोना बधितांसाठी दिलासादायक असं ठरत आहे.
कोविड केअर सेन्टर, लोणावळा येथून उपचार घेऊन परतलेल्या व्यक्तींना त्यांचे अनुभव विचारले असता, त्यांनी याठिकाणी दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि येथील संपूर्ण स्टाफ कडून मिळणारी आपुलकी, आपलेपणा त्याचप्रमाणे मानसिक बळ हे करोना सारख्या रोगाशी लढत असताना फायदेशीर ठरल्याचे सांगितले.
लोणावळा नगरपरिषद official या नगरपरिषदेच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेल ला subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा


No comments:
Post a Comment