लोणावळा येथील गवळीवाडा विभागातील श्रीराम वाडी मधील एका ४५ वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल आज शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे लोणावळा शहरात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४६ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोविड केअर सेन्टर, लोणावळा याठिकाणी शुक्रवारी ९ जणांचे स्वॅब कोरोना चाचणी साठी घेण्यात आले होते. त्यातील केवळ एका रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर उर्वरित ८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. याशिवाय हुडको, तुंगार्ली आणि भांगरवाडी येथील प्रत्येकी एका रुग्णाला बर वाटत असल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment