लोणावळा शहरात आज सोमवारी पाच नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. यामुळे आता शहरातील कोरोना बधितांचे दीड शतक पार झाले असून एकूण संख्या १५२ झाली आहे. याशिवाय कोरोना वर मात करून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत असून आतापर्यंत शहरातील एकूण ८९ रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.
आज लोणावळा शहरातील वर्धमान सोसायटीमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा तर तुंगार्ली पोलीस लाईन याठिकाणी एकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वर्धमान सोसायटीमधील पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एक ६५ वर्षीय महिला, एक ४३ वर्षीय व्यक्ती आणि दोन १८ व १६ वर्षीय मुलं अशा चार जणांचा समावेश आहे, तर पोलीस लाईन येथील अंदाजे ५५ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.
सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्या या पाच रुग्णांमुळे शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या १५२ झाली आहे. शहरातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८९ झाली आहे तर सक्रिय रुग्णसंख्या ५६ इतकी झाली आहे. याशिवाय आतापर्यत शहरातील ७ रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.
लोणावळा शहरातील आज अखेर आढळून आलेल्या एकूण कोरोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे
तुंगार्ली - ०९【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०३】
पांगोळी, वलवण - २४【बरे झालेले रुग्ण - १२ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ११】
नांगरगाव - ०६【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०० / सक्रीय रुग्ण - ००】
भांगरवाडी - २७【बरे झालेले रुग्ण - २० / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०७】
नगरपरिषद कार्यालय, वर्धमान सोसा. 'जी' वॉर्ड - १४【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०७】
रेल्वे विभाग, बारा बंगला - ०६【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ००】
गवळीवाडा - १३【बरे झालेले रुग्ण - ०४ / मृत्यू - ०२ / सक्रिय रुग्ण - ०७】
खंडाळा - २१【बरे झालेले रुग्ण - १३ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०८】
जुना खंडाळा, रायवूड - ०५【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ००】
लोणावळा गावठाण, बाजारपेठ - २४【बरे झालेले रुग्ण - १२ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ११】
सह्याद्री नगर, हुडको - ०२【बरे झालेले रुग्ण - ०१ / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०१】
भुशी, रामनगर - ०१【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०१】

No comments:
Post a Comment