आजचा शुक्रवारचा दिवस आतापर्यंत लोणावळेकरांसाठी दिलासादायक बातमी देणारा ठरला आहे. आजच्या दिवसात अद्यापी एकही कोरोना बधिताची नोंद न झाल्याने किमान शुक्रवारची पाटी कोरी राहिली आहे. शिवाय दोन कोरोना बाधित पूर्णतः बरे झाल्याने त्यांना कोविड केअर सेन्टर मधून डिस्चार्ज ही देण्यात आल्याने लोणावळा शहरातील सक्रिय रुग्णसंख्या कमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोविड केअर सेन्टर, झालावाडी याठिकाणी गुरुवारी १० जणांचे स्वॅब कोरोना तपासणी साठी घेण्यात आले होते. त्यातील केवळ एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तो ग्रामीण परिसरातील औंढे गावातील ३५ वर्षीय व्यक्ती आहे. याशिवाय आज अद्यापपर्यंत खाजगी रुग्णालयातूनही एकही अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झालेला नाही. त्यामुळे शहरातील कोरोना बधितांची संख्या १४५ वरच थबकली आहे. शहरातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ६२ झाली आहे तर सक्रिय रुग्णसंख्या ७६ इतकी झाली आहे. याशिवाय आतापर्यत शहरातील ७ रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.
लोणावळा शहरातील आज अखेर आढळून आलेल्या एकूण कोरोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे
तुंगार्ली - ०८【बरे झालेले रुग्ण - ०२ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०५】
पांगोळी, वलवण - २४【बरे झालेले रुग्ण - ०७ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - १६】
नांगरगाव - ०६【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०० / सक्रीय रुग्ण - ००】
भांगरवाडी - २७【बरे झालेले रुग्ण - १६ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ११】
नगरपरिषद कार्यालय, वर्धमान सोसा. 'जी' वॉर्ड - १०【बरे झालेले रुग्ण - ०३ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०६】
रेल्वे विभाग, बारा बंगला - ०६【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ००】
गवळीवाडा - १२【बरे झालेले रुग्ण - ०३ / मृत्यू - ०२ / सक्रिय रुग्ण - ०७】
खंडाळा - २०【बरे झालेले रुग्ण - १० / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - १०】
जुना खंडाळा, रायवूड - ०५【बरे झालेले रुग्ण - ०४ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०१】
लोणावळा गावठाण, बाजारपेठ - २४【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - १७】
सह्याद्री नगर, हुडको - ०२【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०२】
भुशी, रामनगर - ०१【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०१】

No comments:
Post a Comment