लोणावळा शहरात आज रविवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी ६ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे लोणावळा शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज अखेरपर्यंत १३६२ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत ९५२ रुग्ण कोरोना वर मात करून बरे झाले आहे. आजमितीला शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ३६३ इतकी आहे. याशिवाय आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे मृत झालेल्यांची एकूण संख्या ४७ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये भांगरवाडी विभागातील २, गवळीवाडा विभागातील २ तर तुंगार्ली आणि हुडको या दोन विभागातील प्रत्येकी १ अशा एकूण ६ जनांचा समावेश आहे.
शहरातील कुठल्या विभागातील, कोणत्या वयोगटातील किती पॉझिटिव्ह, किती जण सक्रिय, किती जणांना डिस्चार्ज ही सर्व माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपण खालील छायाचित्र बघू शकता.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा ( ग्रुप नंबर 10 )
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:
Post a Comment