लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Monday, 12 October 2020

लोणावळा शहरात आज कोरोनाचा केवळ एक रुग्ण

लोणावळा लोणावळा शहरात आज केवळ १ रुग्ण मिळून आला आहे. लोणावळा शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेने माझा लोणावळा माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत शहरातील ज्येष्ठ नागरिकांची मोफत अँन्टीजन तपासणी मोहिम हाती घेतली आहे. यापुर्वी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत शहरातील सर्व नागरिकांची स्क्रिनिंग करण्यात आली होती. या सर्व उपक्रमांचा परिणाम म्हणून शहरातील कोरोना रुग्णसंख्या घटू लागली आहे. 
     
शहरात आज रविवारी कोरोनाच्या १ नविन रुग्णाची नोंद झाली. त्यामुळे लोणावळा शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज अखेरपर्यंत १३६३ इतकी झाली आहे. आज १० जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने आतापर्यंत ९७२ रुग्ण कोरोना वर मात करून बरे झाले आहे. आजमितीला शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या केवळ ३५४ इतकी आहे. कोरोना संसर्गामुळे आजपर्यत शहरात ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. यापुढे शहरात कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू होऊ नये याकरिता मृत्यूदर शून्यावर आणण्याचे उदिष्ट्य लोणावळा नगरपरिषदेने ठेवले आहे. आज मिळालेल्या माहितीनुसार आज गावठाण विभागातील एका रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा  ( ग्रुप नंबर 10 )
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages