लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, 13 October 2020

लोणावळा शहरात कोरोना मुक्त रुग्णांची संख्या सक्रिय रुग्णांच्या तिप्पट; मृत्यूदर घटून ३ टक्क्यांवर

लोणावळा शहरात आज ७ नवे कोरोना बाधित रुग्ण
लोणावळा शहरात आज मंगळवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी ७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे लोणावळा शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज अखेरपर्यंत १३७२ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत ९९५ रुग्ण कोरोना वर मात करून बरे झाले आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे हे प्रमाण सध्याच्या सक्रिय रुग्णसंख्येच्या तिप्पट जास्त असून लोणावळेकरांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. आजमितीला शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ३२९ इतकी आहे.

शहरातील कोरोना मुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात देखील लक्षणीय घट झाली असून सध्या हे प्रमाण ३ टक्क्यांवर खाली आले आहे. लोणावळा शहरात आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे मृत झालेल्यांची एकूण संख्या ४८ झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये वर्धमान सोसायटी विभागातील २, गावठाण विभागातील २ तर तुंगार्ली, नांगरगाव आणि खोंडगेवाडी या तीन विभागातील प्रत्येकी १ अशा एकूण ७ जनांचा समावेश आहे. 

शहरातील कुठल्या विभागातील, कोणत्या वयोगटातील किती पॉझिटिव्ह, किती जण सक्रिय, किती जणांना डिस्चार्ज ही सर्व माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपण खालील छायाचित्र बघू शकता. 

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा  ( ग्रुप नंबर 10 )
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages