लोणावळा : कोविड काळात कोरोना बाधित रुग्णाच्या सी.टी.स्कॅन चाचणीसाठी शासकीय दरापेक्षा जास्तीचे पैसे घेणाऱ्या लोणावळा शहरातील डायग्नोसिस सेंटरला नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि नगरसेवक श्रीधर पुजारी यांनी चपराक दिल्यानंतर या सेंटर कडून सुमारे १०० रुग्णांना त्यांच्याकडून घेण्यात आलेले जास्तीचे पैसे परत देण्यात आले.
शहरातील लोणावळा डायग्नोसिस सेंटर येथे कोविड संदर्भातील एच.आर. सी.टी. स्कॅन चाचणी करण्यासाठी ४००० ते ७००० रुपयांची आकारणी करण्यात आली होती. खरंतर शासकीय नियमाप्रमाणे वरील चाचणी साठी २००० रुपये घेणं अपेक्षित होत. यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यावर नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी संबंधित डायग्नोसिस सेंटरच्या व्यवस्थापनाला जाब विचारीत नियमानुसारच पैसे घेण्याच्या सूचना दिल्या तसेच माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी या डायग्नोसिस सेंटरची तक्रार पोलिसांमध्ये तसेच आरोग्य विभागाकडे केली. या तक्रारीच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने संबंधित डायग्नोसिस सेंटरला सूचना करीत ज्या रुग्णांकडून जास्तीचे पैसे घेतले त्यांना ते परत करण्यास सांगितले.
त्यानुसार सोमवारी दुपारी संबंधित लोणावळा डायग्नोसिस सेंटर व्यवस्थापनाने नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष संजय घोणे, माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक श्रीधर पुजारी, शिक्षण समिती सभापती ब्रिंदा गणात्रा, नगरसेवक निखिल कवीश्वर, विशाल पाडाळे, पाणी पुरवठा सभापती सुधीर शिर्के, उमेश तळेगावकर यांच्या उपस्थितीत दिनांक २६/९/२०२० पासून ज्या ज्या रुग्णाचा एच.आर. सी.टी. स्कॅन चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आला होता आणि त्यांच्याकडून जास्तीचे पैसे आकारण्यात आले होते आशा सुमारे १०० रुग्णाचे ३ लाख रुपये परत केले. आरोग्य अधिकारी इंद्रनील पाटील तसेच वडगाव मावळचे ट्रेजर अधिकारी राहुल कदम हे देखील याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी सर्व नागरिकांनी नगराध्यक्षा जाधव आणि नगरसेवक पुजारी यांचे आभार मानले.

Excellent work we expecting like this from all of you
ReplyDeleteBahut Acha Kam kiye hai garib log kahain se kaheinge itne sare paise
ReplyDeleteGood work mam & sir
Good job madam and team
ReplyDelete