लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, 17 February 2022

पुणे लोणावळा लोकल सेवा पुर्ववत सुरू करा; माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांचे रेल्वेमंत्र्यांना निवेदन

पुणे लोणावळा लोकल सेवा पुर्ववत सुरू करा; माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांचे रेल्वेमंत्र्यांना निवेदन

लोणावळा : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून सर्व व्यवहार आता पूर्वपदावर येत आहे. मात्र लोणावळा पुणे लोणावळा लोकल सेवा अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली नसल्याने शालेय विद्यार्थ्यांसह कामगार वर्ग आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. त्यापार्श्वभूमीवर पुणे लोणावळा लोकल सेवा पुर्ववत सुरू करा तसेच सर्व एक्सप्रेस गाड्याचा लोणावळा स्थानकावरील थांबा पुर्वीसारखा सुरु करा अशी मागणी लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी रेल्वेमंत्री दानवे यांची मुंबईत भेट घेत त्यांच्याकडे सदरची मागणी केली. यावेळी रेल्वेचे महा व्यवस्थापक श्री लाहोटी तसेच लोणावळा शिक्षण मंडळाचे माजी सभापती आशिष बुटाला, सुजाता मेहता हे देखील उपस्थित होते.

कोरोना काळात पुणे लोणावळा लोकल सेवा बंद करण्यात आली होती. मागील काळात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी लोकलच्या काही फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र कोरोनाचा कहर आता कमी झाल्याने शाळा, महाविद्यालयांसह सर्व व्यावसायिक अस्थापना पुर्ण क्षमतेने सुरु झाल्या आहेत. त्यातच परिक्षांचा कालावधी देखील सुरू होत असल्याने विद्यार्थी, कामगार, महिला या सर्वांची लोकल सेवे अभावी मोठी गैरसोय होत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी लोकल सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लोणावळ्यातील भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम देखील रेल्वेच्या अनास्थेमुळे रखडले असून त्याला देखील गती देण्यात यावी अशी मागणी सुरेखा जाधव व श्रीधर पुजारी यांनी केली आहे. रेल्वेमंत्री दानवे याबाबत राज्य शासनाला सूचना देण्याचे आश्वासन यावेळी दिले आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages