माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या प्रयत्नांना यश; लोकलच्या तीन फेऱ्या वाढणार
लोणावळा : नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने लोणावळा पुणे लोणावळा लोकल सेवा पूर्ववत करीत लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात या मागणीसाठी लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची आजच मुंबई मध्ये भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. त्यांच्या या प्रयत्नांना तात्काळ यश मिळाले असून लोकलच्या तीन फेऱ्या वाढवण्याचा निर्णय रेल्वेने प्रशासनाने घेतला असून तसा प्रस्ताव तयार केला आहे.
कोरोनाचा कहर आता कमी झाल्याने शाळा, महाविद्यालयांसह सर्व व्यावसायिक अस्थापना पुर्ण क्षमतेने सुरु झाल्या आहेत शालेय विद्यार्थ्यांसह कामगार वर्ग आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. त्यापार्श्वभूमीवर पुणे लोणावळा लोकल सेवा पुर्ववत सुरू करा अशी आग्रही मागणी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि रेल्वेचे महा व्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांच्याकडे केली होती. त्यावर तात्काळ निर्णय घेत लोणावळ्याहुन पुण्याकडे जाण्यासाठी सकाळी 7.25 वा., दुपारी 2.50 वा. आणि सायंकाळी 7.00 वा. अशा तीन लोकल फेऱ्या तर पुण्याहून लोणावळ्याकडे येण्यासाठी पहाटे 5.45 वा., सकाळी 9.55 वा. आणि सायंकाळी 5.15 वा. अशा तीन लोकल फेऱ्या सुरू करण्याचा विचार सुरू केला असून तसा प्रस्ताव संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment