लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Friday, 18 February 2022

लोणावळ्यातील रविवारच्या रास्ता रोको आंदोलनाला आमदार सुनील शेळके यांचा पाठिंबा


लोणावळ्यातील रविवारच्या रास्ता रोको आंदोलनाला आमदार सुनील शेळके यांचा पाठिंबा

लोणावळा : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर वलवण ते खंडाळा दरम्यान वारंवार अपघात होऊन अनेक निष्पाप नागरिकांचे जीव जात आहेत. असे असताना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व आयआरबीच्या दोन्ही यंत्रणा बेजबाबदार व हलगर्जीपणा दाखवीत लोणावळा परिसरात कोणतीही उपाययोजना करत नसल्याचा आरोप करीत त्यांच्या विरोधात येत्या रविवारी 20 फेब्रुवारी रोजी लोणावळ्यात जागृत नागरिकांच्या वतीने तिव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व आयआरबी विरोधात पुकारण्यात आलेले हे आंदोलन रास्त मागण्यांसाठी असल्याने त्याला माझा जाहिर पाठिंबा असल्याचे सांगत आमदार सुनिल शेळके या आंदोलनाची योग्य दखल घेतली न गेल्यास यानंतर द्रुतगती मार्गावर यापेक्षाही उग्र आंदोलन करत द्रुतगती मार्गावर चक्काजाम केला जाईल असा इशारा संबंधित यंत्रणांना दिला आहे. 

रविवारी सकाळी 11 वाजता गवळीवाडा नाका येथील भगवान महावीर चौकात हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या पुढाकाराने लोणावळा नगरपरिषदेत घेण्यात आलेल्या बैठकीत आमदार सुनिल शेळके, लोणावळ्यातील जागृत नागरिक, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक सिताराम डुबल, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे, उप अभियंता प्रेरणा कोटकर, आयआरबीचे समन्वयक जयवंत डांगरे, देखभाल दुरुस्ती विभागाचे पत्की यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, विविध पक्षांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. 

आंदोलन कर्त्यांनी निवेदनात दिलेल्या सहा मुद्दयांवर तहसीलदारांनी चर्चा सुरु केली मात्र रस्ते विकास महामंडळ व आयआरबी कडून कोणतेही ठाम व समाधानकारक उत्तर देण्यात आले आहे. प्रस्ताव तयार करतो, मान्यता घेतो, लवकरच काम सुरु करतो अशी उत्तरे देण्यात आली. यावर जागृत नागरिक व आमदार सुनिल शेळके यांनी रविवारच्या आंदोलनाच्या ठिकाणी येताना कोणते काम किती दिवसात पुर्ण होईल याची लेखी उत्तरे घेऊन या असे संबंधितांना सांगण्यात आले. तहसीलदार बर्गे यांनी या बैठकीचे वृत्त संकलन करण्यात आले असून जे ठरले आहे त्याच पद्धतीने व त्याच शब्दांमध्ये उत्तरे लेखी द्या, ज्याठिकाणी ज्या गोष्टी शक्य आहेत त्या तात्काळ करा, अपघातग्रस्त ठिकाणं निश्चित करून उपाययोजना करा अशा सूचना दिल्या. यावेळी वलवण ते खंडाळा हा द्रुतगती मार्गाचा भाग हा लोणावळा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा बायपास असल्याने त्यावर टोल आकारू नका अशी जोरदार मागणी उपस्थितांनी केली. 

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages