लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Wednesday, 23 February 2022

शेतात लागलेल्या वणव्याने आदिवासी कुटुंबाची राखरांगोळी

शेतात लागलेल्या वणव्याने आदिवासी कुटुंबाची राखरांगोळी

मावळ तालुक्यातील पाटण गावात शेतात लागलेलेल्या वणव्यामुळे पेट घेत  एका आदिवासी कुटुंबाच्या झोपडीला आग लागून झोपडी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना  घडली असून अक्षरशः या कुटंबाची राख रांगोळी झाली आहे
सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी हे उघड्यावर आलेले आदिवासी कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

हातावर पोट असलेले लक्ष्मण सोनू वाघमारे असे घर जळून खाक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार लक्ष्मण वाघमारे व त्याचा परिवार सकाळी मोलमजुरीसाठी घराबाहेर पडले.  दुपारच्या वेळी अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण झोपडी जळून खाक झाली आहे. झोपडीतील भांडी, कपडे, अन्न धान्य तसेच त्यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड ही सर्व महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याने हे आदिवासी वाघमारे कुटुंब उध्वस्त होऊन रस्त्यावर आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages